वर्डप्रेस ४.७ वॉन

वर्डप्रेस ४.७, “वॉन” हि प्रख्यात जॅझ गायिका सारा “सॅसी” वॉन यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केलेली आवृत्ती, तुमच्या वर्डप्रेस डॅशबोर्डमध्ये मध्ये डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध आहे. ४.७ मधील नवीन वैशिष्ट्ये तुम्हाला तुमची साईट हवी तशी सेटअप करून सुरु करण्यास मदत करतात.

सादर करीत आहोत ट्वेंटी सेव्हन्टीन

संपूर्णतः नवीन असलेली हि मूलभूत थिम वैशिष्ट्यीकृत प्रतिमा आणि शिर्षक व्हिडिओ च्या द्वारे तुमच्या साईटला जणू जिवंतच करते.

ट्वेंटी सेव्हन्टीन हि थिम व्यावसायिक साईट्स केंद्रित आहे आणि पहिल्या पानांवरील सानुकूलित करता येणारे अनेक विभाग हे तिचे वैशिष्ट्य आहे. विजेट्स, नेव्हिगेशन, सोशल मेनू, लोगो, सानुकूल रंग आणि इतर बऱ्याच गोष्टींद्वारे तुम्ही ती वैयक्तिकृत करू शकता. आपली मूलभूत २०१७ हि थिम कोणत्याही डिव्हाइसवर, बऱ्याच भाषांसोबत आणि विस्तृत वापरकर्त्यांसाठी उत्तम काम करते.


तुमची साईट, तुमचा मार्ग

वर्डप्रेस ४.७ च्या कस्टमायझर मध्ये नवीन वशिष्टये दाखल झाली आहेत जी तुम्हाला तुम्ही केलेल्या सर्व बदलांचे एका अखंड पद्धतीने विना-विध्वंस थेट पुनरावलोकन दाखवते आणि थिम च्या सुरुवातीच्या सेटअप मधून घेऊन जाते.

थिम स्टार्टर कन्टेन्ट

तुम्हाला विकसनास उत्कृष्ठ पाया मिळावा यासाठी, वैयक्तिक थिम्स तुम्हाला स्टार्टर कन्टेन्ट पुरवितात जो तुम्ही तुमची नवी कोरी साईट कस्टमाईझ करताना दिसतो. हा स्टार्टर कन्टेन्ट म्हणजे व्यावसायिक माहिती असलेल्या विजेटचे पुनर्स्थापन कारण्यासंबंधित असू शकतो अथवा उदाहरणादाखल सोशल लिंक्स सहित दिलेला सोशल मेनू असू शकतो अथवा सुंदर प्रतिमांनी युक्त असे स्थिर पहिले पान असू शकतो. काळजी करू नका – जोपर्यंत तुम्ही तुमचा सुरुवातीचा थिम सेटअप सेव्ह करून प्रकाशित करत नाही तोपर्यंत लाईव्ह साईटवर काहीही दिसून येणार नाही.

संपादनासाठीचे शॉर्टकट्स

तुमच्या साईटवरील जे भाग थेट पुनरावलोकनासाठी उपलब्ध आहेत ते भाग चिन्हांकित दिसतील. शॉर्टकट वर क्लिक करा आणि सरळ संपादित करा. स्टार्टर कन्टेन्ट ची जोड मिळाल्यामुळे, तुमच्या साईटचे कस्टमाईझेशन करणे आता पूर्वीपेक्षा अधिक जलद.

शीर्षक व्हिडिओ

कधीकधी एक भव्य वातावरणयुक्त व्हिडिओ अशी हलणारी शिर्षक प्रतिमा हेच तुमच्या साईटबद्दल बरंच काही सांगते; तर मग व्हा पुढे आणि हीच गोष्ट पहा ट्वेंटी सेव्हन्टीन मध्ये. व्हिडिओ साठी काही प्रेरणा हव्यात? शिर्षक व्हिडिओ डाउनलोड आणि वापर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या साईट्स शोधा.

आणखी सहजरित्या मेनू बनवा

बहुतेक मेनू हे तुमच्या साईटवरील पेजेसला लिंक करतात, पण काय होईल जर का तुमच्याकडे काहीच पेजेस नसतील? आता तुम्ही मेनू बनवत असतानाच नवीन पेजेस जोडू शकता तेसुद्धा विना कस्टमाईझर स्क्रीन सोडता आणि तुम्ही केलेल्या बदलांचा त्याग न करता. एकदा का तुम्ही तुमचे कस्टमाईझेशन प्रकाशित केले की नवीन पेजेसमध्ये कन्टेन्ट जोडण्यासाठी ती तुमच्यासाठी तय्यार असतील.

सानुकूल CSS

तुमची साईट परिपूर्ण करण्यासाठी कधीकधी तुम्हाला फक्त काही दृश्य बदलांचीच गरज असते. वर्डप्रेस ४.७ तुम्हाला सानुकूल CSS लिहू देते आणि तुम्ही त्वरित पाहू शकता की तुम्ही केलेल्या बदलांचा तुमच्या साईटवर काय परिणाम झालाय. थेट पूर्वावलोकन तुम्हाला जलद रीतीने काम करण्यास मदत करते पेज रिफ्रेश विना जे की तुमच्या कामाची गती कमी करते.


PDF लघुप्रतिमा पूर्वावलोकन

वर्डप्रेस ४.७ द्वारे तुमच्या दस्तऐवजांच्या संग्रहाचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. PDF फाईल्स अपलोड केल्यानंतर लघुप्रतिमा निर्माण होतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व दस्तऐवजांमधील फरक सहज ओळखू शकता.

डॅशबोर्ड आता तुमच्या भाषेमध्ये

तुमची साईट कोणत्या एका भाषेमध्ये आहे याचा अर्थ असा नाही कि जे कोणी साईट व्यवस्थापनासाठी मदत करतात ते सुद्धा साईट ऍडमिन साठी त्याच भाषेला प्राधान्य देतील. तुमच्या वेबसाईटमध्ये अधिकाधिक भाषा जोडल्यावर वापरकर्त्याची भाषा हा पर्याय तुमच्या वापरकर्ता प्रोफाइल मधे दिसेल.


सादर करीत आहोत रेस्ट एपीआय कन्टेन्ट ऐंडपॉइंट्स

वर्डप्रेस ४.७ मध्ये पोस्ट्स, टिप्पण्या, टर्म्स, वापरकर्ते, मेटा आणि सेटिंग्स यांसाठीच्या रेस्ट एपीआयचा समावेश आहे.

कन्टेन्ट ऐंडपॉइंट्स तुमची वर्डप्रेस साइट मशीनला वाचता येण्याजोगा स्पष्ट व मानकांना अनुसरून असलेला बाह्य मार्ग पुरवितो जेणेकरून प्लगइन्स, थिम्स, एप्स वगैरे नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्गांनी तुमच्या साईटशी संवाद साधू शकतील. विकसन सुरु करण्यासाठी तय्यार आहात? आमच्या रेस्ट एपीआय चा संदर्भ घ्या.


आणखी आनंदी विकसक 😊

पोस्ट टाईप टेम्प्लेट्स

पेज टेम्प्लेट हि सुविधा आता सर्व पोस्ट टाईप्सला सुद्धा उपलब्ध केल्यामुळे, थिम विकासकांना वर्डप्रेस टेम्प्लेट उतरंडीमध्ये अधिक लवचिकता प्राप्त होते.

आणखी प्रगत थिम एपीआय

वर्डप्रेस ४.७ मध्ये थिम विकासकांसाठी नवीन फंक्शन्स, हूक्स तसेच बिहेविअर चा समावेश आहे.

मोठ्या प्रमाणात सानुकूल क्रिया

याद्या, आता मोठ्या प्रमाणातील एडिट आणि डिलीट च्या वैशिष्ट्यांसह

WP_Hook

ऍक्शन्स व फिल्टर्स शी संबंधित मूळ कोड काळजीपूर्वक आणि नव्याने पुन्हा लिहिला आहे व हे करत असतानाच आढळलेल्या चुका दुरुस्त केल्या आहेत.

सेटिंग्स नोंदणी एपीआय

टाइप, वर्णन आणि रेस्ट एपीआय च्या सदृश्य समाविष्टतेसाठी register_setting()  सुधारित केले आहे.

सानुकूल चेंजसेट

कस्टमाईझ चेंजसेट्स कस्टमायझर मधील बदल सक्तीचे बनविते, जसे कि ऑटो-सेव्ह ड्राफ्ट्स. हे स्टार्टर कन्टेन्ट सारखे रोमांचक नवीन वैशिष्ट्य सुद्धा शक्य करते.


संघ

या आवृत्तीच्या प्रकाशनाचे नेतृत्व हेलन हौ-सँडी हीने जेफ पॉलऍरॉन जॉर्बिन या प्रतिनिधींच्या सहकार्याने केले आणि यामध्ये खालील व्यक्तींचा देखील समावेश होता. या आवृत्तीसाठी योगदान दिलेल्या ४८२ जणांपैकी २०५ जणांनी पहिल्यांदाच योगदान दिले आहे. तर मग आता तुमच्या पसंतीच्या म्युझिक सॉफ्टवेअरवर सॅस्सी सारा वॉन चे संगीत लावा आणि अधिक माहितीसाठी त्यांच्या काही प्रोफाईल्स तपासा:

Aaron D. Campbell, abrightclearweb, Achal Jain, achbed, Acme Themes, Adam Silverstein, adammacias, Ahmad Awais, ahmadawais, airesvsg, ajoah, Aki Björklund, AkshayVinchurkar, Alex Concha, Alex Dimitrov, Alex Hon, alex27, allancole, Amanda Rush, Andrea Fercia, Andreas Panag, Andrew Nacin, Andrew Ozz, Andrey “Rarst” Savchenko, Andy Meerwaldt, Andy Mercer, Andy Skelton, Aniket Pant, Anil Basnet, Ankit K Gupta, Anthony Hortin, antisilent, Anton Timmermans, Antti Kuosmanen, apokalyptik, artoliukkonen, Arunas Liuiza, attitude, backermann, Bappi, Ben Cole, Bernhard Kau, BinaryMoon, Birgir Erlendsson (birgire), BjornW, bobbingwide, boblinthorst, boboudreau, bonger, Boone B. Gorges, Brady Vercher, Brainstorm Force, Brandon Kraft, Brian Hogg, Brian Krogsgard, Bronson Quick, Caroline Moore, Casey Driscoll, Caspie, Chaos Engine, cheeserolls, chesio, chetansatasiya, choong, Chouby, chredd, Chris Jean, Chris Marslender, Chris Smith, Chris Van Patten, Chris Wiegman, chriscct7, chriseverson, Christian Nolen, Christian Wach, Christoph Herr, Clarion Technologies, Claudio Sanches, Claudio Sanches, ClaudioLaBarbera, codemovement.pk, coderkevin, codfish, coreymcollins, Curdin Krummenacher, Curtiss Grymala, Cătălin Dogaru, danhgilmore, Daniel Bachhuber , Daniel Kanchev, Daniel Pietrasik, Daniele Scasciafratte, Daryl L. L. Houston (dllh), Dave Pullig, Dave Romsey (goto10), David A. Kennedy, David Chandra Purnama, David Herrera, David Lingren, David Mosterd, David Shanske, davidbhayes, Davide ‘Folletto’ Casali, deeptiboddapati, delphinus, deltafactory, Denis de Bernardy, Derek Herman, Derrick Hammer, Derrick Koo, dimchik, Dinesh Chouhan, Dion Hulse, dipeshkakadiya, dmsnell, Dominik Schilling, Dotan Cohen, Doug Wollison, doughamlin, Drew Jaynes, duncanjbrown, dungengronovius, DylanAuty, Eddie Hurtig, Eduardo Reveles, Edwin Cromley, ElectricFeet, Elio Rivero, Ella Iseulde Van Dorpe, elyobo, enodekciw, enshrined, Eric Andrew Lewis, Eric Lanehart, Evan Herman, Felix Arntz, Fencer04, Florian Brinkmann, Florian TIAR, FolioVision, fomenkoandrey, Frank Klein, Frankie Jarrett, frankiet, Fred, Fredrik Forsmo, fuscata, Gabriel Maldonado, Gary Jones, Gary Pendergast, Geeky Software, George Stephanis, Goran Šerić, Graham Armfield, Grant Derepas, Gregory Karpinsky (@tivnet), Hardeep Asrani, Henry Wright, hiddenpearls, Hinaloe, Hugo Baeta, Iain Poulson, iamjolly, Ian Dunn, ian.edington, idealien, Ignacio Cruz Moreno, imath, Imnok, implenton, Ionut Stanciu, Ipstenu (Mika Epstein), Ivan, ivdimova, J.D. Grimes, Jacob Peattie, Jake Spurlock, James Nylen, jamesacero, Japh, Jared Cobb, jayarjo, jdolan, jdoubleu, Jeffrey de Wit, Jeremy Felt, Jeremy Pry, jimt, Jip Moors, jmusal, Joe Dolson, Joe Hoyle, Joe McGill, Joel James, johanmynhardt, John Blackbourn, John Dittmar, John James Jacoby, John P. Bloch, John Regan, johnpgreen, Jon (Kenshino), Jonathan Bardo, Jonathan Brinley, Jonathan Daggerhart, Jonathan Desrosiers, Jonny Harris, jonnyauk, jordesign, JorritSchippers, Joseph Fusco, Josh Eaton, Josh Pollock, joshcummingsdesign, joshkadis, Joy, jrf, JRGould, Juanfra Aldasoro, Juhi Saxena, Junko Nukaga, Justin Busa, Justin Sainton, Justin Shreve, Justin Sternberg, K.Adam White, kacperszurek, Kailey (trepmal), KalenJohnson, Kat Hagan, Keanan Koppenhaver, keesiemeijer, kellbot, Kelly Dwan, Ken Newman, Kevin Hagerty, Kirk Wight, kitchin, Kite, kjbenk, Knut Sparhell, koenschipper, kokarn, Konstantin Kovshenin, Konstantin Obenland, Konstantinos Kouratoras, kuchenundkakao, kuldipem, Laurel Fulford, Lee Willis, Leo Baiano, LittleBigThings (Csaba), Lucas Stark, Luke Cavanagh, Luke Gedeon, lukepettway, lyubomir_popov, mageshp, Mahesh Waghmare, Mangesh Parte, Manish Songirkar, mantismamita, Marcel Bootsman, Marin Atanasov, Mario Valney, Marius L. J. (Clorith), Mark Jaquith, Mark Root-Wiley, Mark Uraine, Marko Heijnen, markshep, matrixik, Matt Banks, Matt Jaworski, Matt King, Matt Mullenweg, Matt van Andel, Matt Wiebe, Matthew Haines-Young, mattyrob, Max Cutler, Maxime Culea, Mayo Moriyama, mbelchev, mckernanin, Mel Choyce, mhowell, Michael Arestad, Michael Arestad, michalzuber, Mike Auteri, Mike Crantea, Mike Glendinning, Mike Hansen, Mike Little, Mike Schroder, Mike Viele, Milan Dinić, modemlooper, Mohammad Jangda, Mohan Dere, monikarao, morettigeorgiev, Morgan Estes, Morten Rand-Hendriksen, moto hachi ( mt8.biz ), mrbobbybryant, Naim Naimov, NateWr, nathanrice, Nazgul, Ned Zimmerman, Nick Halsey , Nicolas GUILLAUME, Nikhil Chavan, Nikhil Vimal, Nikolay Bachiyski, Nilambar Sharma, noplanman, nullvariable, odie2, odyssey, Okamoto Hidetaka, orvils, oskosk, Otto Kekäläinen, ovann86, Pascal Birchler, patilvikasj, Paul Bearne, Paul Wilde, Payton Swick, pdufour, Perdaan, Peter Wilson, phh, php, Piotr Delawski, pippinsplugins, pjgalbraith, pkevan, Pratik, Pressionate, Presskopp, procodewp, quasel, Rachel Baker, Rahul Prajapati, Ramanan, Rami Yushuvaev, ramiabraham, ranh, Red Sand Media Group, Rian Rietveld, Richard Tape, Robert D Payne, Robert Noakes, Rocco Aliberti, Rodrigo Primo, Rommel Castro, Ronald Araújo, Ross Wintle, Roy Sivan, Ryan Kienstra, Ryan McCue, Ryan Plas, Ryan Welcher, Sal Ferrarello, Sami Keijonen, Samir Shah, Samuel Sidler, Sandesh, Sang-Min Yoon, Sarah Gooding, Sayed Taqui, schlessera, schrapel, Scott Reilly, Scott Taylor, scrappy@hub.org, scribu, seancjones, Sebastian Pisula, Sergey Biryukov, Sergio De Falco, shayanys, shprink, simonlampen, skippy, smerriman, snacking, Soeren Wrede, solal, Stanimir Stoyanov, Stanko Metodiev, Steph, Steph Wells, Stephanie Leary, Stephen Edgar, Stephen Harris, Steven Word, stevenlinx, stubgo, Sudar Muthu, Swapnil V. Patil, swapnild, Takahashi Fumiki, Takayuki Miyauchi, Tammie Lister, tapsboy, Taylor Lovett, team, tg29359, tharsheblows, the, themeshaper, thenbrent, thomaswm, Thorsten Frommen, tierra, Tim Nash, Timmy Crawford, Timothy Jacobs, Tkama, tnegri, Tom Auger, Tom J Nowell, tomdxw, Toro_Unit (Hiroshi Urabe), Torsten Landsiedel, transl8or, traversal, Travis Smith, Triet Minh, Trisha Salas, tristangemus, Truong Giang, tsl143, Ty Carlson, Ulrich, Utkarsh, Valeriu Tihai, Vishal Kakadiya, voldemortensen, Vrunda Kansara, webbgaraget, WebMan Design | Oliver Juhas, websupporter, Weston Ruter, William Earnhardt, williampatton, Wolly aka Paolo Valenti, yale01, Yoav Farhi, Yoga Sukma, youknowriad, Zach Wills, Zack Tollman, Ze Fontainhas, zhildzik, and zsusag.

रॅमी अब्राहम यांचे या आवृत्तीसाठी बनविलेल्या प्रकाशन व्हिडिओ बद्दल तसेच बीटा आणि आरसी साठीच्या घोषणापर पोस्ट्स मध्ये आपल्याबरोबर शेअर केलेल्या हायकूबद्दल खास आभार.

शेवटी, सर्व समुदाय अनुवादकांचे देखील खास आभार ज्यांनी वर्डप्रेस ४.७ वर काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच प्रकाशनाच्यावेळेपर्यंत वर्डप्रेस ५२ पेक्षा अधिक भाषांमध्ये पूर्णपणे अनुवादित होऊ शकले आणि इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित होत आहे. याव्यतिरिक्त वर्डप्रेस ४.७ च्या प्रकाशन व्हिडिओचे मथळे ४४ भाषांमध्ये उपलब्ध झाले आहेत.

आमच्या बरोबर चलायचे असल्यास अथवा आम्हास मदत करावयाची असल्यास, मेक वर्डप्रेस आणि आमचा कोअर डेव्हलपमेंट ब्लॉग पहा. वर्डप्रेसची निवड केल्याबद्दल धन्यवाद – आम्ही आशा करतो कि तुम्ही याचा आनंद घ्याल!

प्रतिक्रिया व्यक्त करा